महिला मुख्यमंत्री का नाही? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या…
VIDEO | विधानभवनात सर्व महिला सदस्यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्याकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत
मुंबई : अवघ्या जगभरात आज महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. तर अनेक ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. अशातच आज विधानभवनात आगमन होतेवेळी सर्व महिला सदस्यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम सध्या विधान भवनात होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच, आजच्या विधानसभा कार्यक्रम पत्रिकेवर सर्व लक्षवेधी सूचना महिला सदस्यांच्याच घेण्यात आल्या आहेत. महिलांना डावलता कामा नये, त्यांनी संधी मिळालयला हवी. महिलाच्या विकासाचं आणि न्यायाचं धोरण राबविण्यासाठी काय काम केलं जात आहे, याला महत्त्व असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात महिला उच्च पदावर आहेत. बऱ्याचशा महिलांना पूर्वीपेक्षा आता अधिक संधी मिळत आहे. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचे ठाकरे गटाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.