Fadnavis VS Malik | देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप
आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला.
आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला. देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे अनेक आरोप केले होते. गेल्या 62 वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षांच्या काळात कोणी आरोप करु शकलं नाही. मात्र, तुम्ही माझ्यावर कवडीमोल दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला. तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती, असं नवाब मलिक म्हणाले.