Special Report : पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी!
चंद्रकांत खैरे म्हणाले की, एमआयएमने दंगली घडविल्या. शहरात लुटालूट सुरू आहे. एमआयएमचे अनेक नगरसेवक व नेते पक्ष सोडून जात आहेत. यांची नौटंकी सुरू आहे.
औरंगाबादः एकीकडे औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भवदिव्य पुतळा (Shivaji Statue) उभारला जातोय. दुसरीकडे शहरातील सुप्रसिद्ध अशा कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची तयारी सुरूय. मात्र, या पुतळा उभारणीवरून ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत जुंपली आहे. आमचा पुतळ्याला विरोध नाही. मात्र, महाराजांचे नाव घेऊन राजकारणासाठी रक्त का आटवता, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiaz Jaleel) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना केला आहे. तर खैरे यांनी एमआयएमने दंगली घडविल्या. शहरात लुटालूट सुरू आहे, असा गंभीर आरोप केला आहे. येणाऱ्या काळात औरंगाबाद महापालिका निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर पुतळ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 23, 2022 11:21 PM