एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार? दोन्ही पक्षातील नेते म्हणताय….
शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही. तर शिंदे गटासोबत युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय?
मुंबई, ५ जानेवारी २०२४ : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे आणि शिंदे गट यांच्यात असणाऱ्या विचारधारेवर भाष्य केले आहे. शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही. तर शिंदे गटासोबत युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी असे म्हटले की, ‘एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची विनंती केली आहे. तर राज ठाकरे सोबत आल्यास निवडणुकीत फायदा होईल’, असेही संजय शिरसाट म्हणाले.
Published on: Jan 05, 2024 02:01 PM