Amarinder Singh | पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिला राजीनामा
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग (Capt. Amrinder Singh) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची (Governor) भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली आहे.