दाट धुकं, वळणांचा रस्ता अन् उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ… बघा आंबा घाटातून निसर्गाचा नजारा

| Updated on: Jul 20, 2024 | 4:35 PM

पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कोकणातील आंबा घाटाकडे वळताय. आंबा घाटातील दाट धुक्यात वेड्या वाकड्या वळणांचा हरवलेला रस्ता तर कधी उंचच उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ सध्या कोकणात सुरू आहे. पावसाळ्यामध्ये सह्याद्री हिरवा शालू पांघरून पर्यटकांना साद घालताना दिसतोय

Follow us on

पश्चिम घाट रागांनी सजलेल्या कोकणातील आंबा घाटात सध्या निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील सौंदर्य अधिकच खुलून आलंय. जिथे नजर जाईल तिथे हिरवा गर्द शालू पांघरलेलं निसर्गाचं सौंदर्य सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे सर्वच पर्यटकांचे पाऊलं आपसूक कोकणाच्या दिशेने पडताय. पावसाळ्यात कोकणातील घाटांचं सौंदर्य बहरलं आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कोकणातील आंबा घाटाकडे वळताय. आंबा घाटातील दाट धुक्यात वेड्या वाकड्या वळणांचा हरवलेला रस्ता तर कधी उंचच उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ सध्या कोकणात सुरू आहे. पावसाळ्यामध्ये सह्याद्री हिरवा शालू पांघरून पर्यटकांना साद घालताना दिसतोय. पावसाळी पर्यटनासाठी आंबा घाट पर्यटकांसाठी हाँट स्पाँट ठरतोय.. याच आंबा घाटातून निसर्गाचा नजारा कसा आहे बघा व्हिडीओ