लवकर मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवा, त्यानंतर…, ठाकरे गटाच्या नेत्याचं शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज
VIDEO | भाजप जातीय आणि धार्मिक रंग देत, दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतंय, कुणी केला गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : भाजप जातीय आणि धार्मिक रंग देत, दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. यावेळी त्यांनी जिथं निवडणुका आहेत तिथेच दंगली का होतात असा सवालही उपस्थित केला. जनतेने सावध राहवं, जनतेने कोणत्याही दंगलीत सहभागी होऊ नये. सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर देखील हल्लाबोल केला. तर सत्तासंघर्षाचा निकाल नुकताच लागला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले आहे. यावरही अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, लवकरात लवकर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवावा. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय काय होतं ते पहावं, असे म्हणत आंबादास दानवे यांनी राज्यसरकारला सूचक इशारा दिला आहे.