‘त्यांच्यात दम नाही ते फक्त सुके दम देतात’, गुलाबराव पाटील यांच्यावर कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: Apr 22, 2023 | 8:02 AM

VIDEO | गुलाबराव पाटील यांनी आम्हाला चौकट शिकवू नये, महाराष्ट्रात त्यांची जहागीर नाही, ठाकरे गटातील नेत्याचा घणाघात

जळगाव : उद्धव ठाकरे खेड, मालेगावनंतर ठाकरे गट म्हणून स्वतंत्रपणे तिसरी सभा जळगावातच घेत आहेत. उद्धव ठाकरे येत्या रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताय. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे. राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचं पुढचं लक्ष्य जळगाव आहे. दरम्यान, यासभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेनेत वाक् युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या सभेवरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात घुसून तर दाखवा, असा इशारा दिला होता. या टीकेवरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, गुलाबराव पाटलांनी सभेत घुसून दाखवाव ते परत जातील का मग त्यांनी ते बघावं. गुलाबराव पाटलांमध्ये दम नाही, ते फक्त सुके दम देतात. गुलाबराव पाटलांनी आम्हाला चौकट शिकवू नये या जळगाव आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची जहागीर नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर पलटवार करताना पुन्हा इशारा दिला आहे.

Published on: Apr 22, 2023 08:00 AM
संजय राऊत यांच्या जळगावातील स्वागतावर काय म्हणाले गुलाबराव पाटील?
उन्हाची भीषण दाहकता अन् पाण्यानं बेहाल, १५ ते १७ दिवसांनी होतोय पाणी पुरवठा