मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला जबाबदार कोण? ‘या’ नेत्यानं दोषींचं थेट नावंच सांगितलं
VIDEO | 12 श्रीसेवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आक्रमक होत 'या' नेत्याची मागणी
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जातोय, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले असले तरी या लोकांच्या जीवाला सांस्कृतिक विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मी आदर करतो. मात्र त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना राज्य सरकारने येणाऱ्या श्री सदस्यांसाठी केलेली उपाययोजना अत्यंत अपुरी होती. त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.