‘मराठ्यांचं नाव खराब करू नका’, गुलाबराव पाटील यांना कुणी लगावला टोला?

| Updated on: Feb 25, 2023 | 2:56 PM

VIDEO | गुलाबराब पाटील यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटातील नेत्याचं सडेतोड उत्तर, बघा व्हिडीओ?

लातूर : एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं, यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे.आम्हाला मुख्यमंत्री मराठ्याचा करायचा होता, म्हणून आम्ही गद्दारी केली असे गुलाबराव पाटील म्हणाले, यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ज्या ज्या मराठ्यांनी गद्दारी केली त्यांचे नाव इतिहासात कुठेच नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्याचा इतिहास खराब करू नका. तु्म्ही गद्दारी करणारे कधी मराठा होऊ शकत नाहीत, तुम्हीही मराठे होऊ शकत नाही. मराठा ही जात नाही तर वृत्ती आहे हे लक्षात ठेवा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी गुलाबराब पाटील यांच्यासह शिंदे गटातील नेत्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Feb 25, 2023 02:56 PM
तर गुलाबराव पाटील यांच्या मनातलं सांगितलं असतं, सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
…म्हणून तुम्ही मराठा होऊच शकत नाही; ठाकरे गटाच्या नेत्याने गुलाबराव पाटील यांना फटकारलं