ज्यांना कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून कुणाचा निशाणा?

| Updated on: Apr 23, 2024 | 2:49 PM

चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने असा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसताय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.

बारामती मतदारसंघात पवार कुटुंबीयांमध्येच सामना रंगताना दिसणार आहे. अशातच अजित पवार यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील आपल्या आईचा सुनेत्रा पवार यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. अशातच आता त्यांना आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने असा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसताय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केलाय. ‘ जे 30-40 आमदार ज्यांना कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. ज्याला गरज आहे त्यांना दिलीच पाहिजे. पण शान म्हणून कुणाला अशी सुरक्षा दिली नाही पाहिजे. ‘

Published on: Apr 23, 2024 02:49 PM