अंबादास दानवे येत्या 8-10 दिवसांत आमच्यासोबत…, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा काय?

| Updated on: Mar 19, 2024 | 2:29 PM

काल वसमत कळमनुरी, सेनगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कुटुंब संवाद मेळावा पार पडला. कळमनुरीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. त्या टीकेनंतर बांगर यांचं जोरदार प्रत्युत्तर

हिंगोली, १९ मार्च २०२४ : हिंगोली लोकसभेमध्ये कालपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कुटुंब संवाद मेळावा दौरा सुरू आहे. काल वसमत कळमनुरी, सेनगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कुटुंब संवाद मेळावा पार पडला. कळमनुरीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. त्या टीकेनंतर आमदार संतोष बांगर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘संजय राऊत हे शिवसेना संपवत आहे, तरी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही. बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना गमावली आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करावा. तर मला उत्तर सभा घेण्याची गरज नाही, मी उभा राहिला की सभा सुरू होते. असे बोलत असताना अंबादास दानवे आठ-दहा दिवसात आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील’, असा दावाही संतोष बांगर यांनी केला.

Published on: Mar 19, 2024 01:57 PM
खडसेंनी वयाचं भाव ठेवावं, भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला जोरदार पलटवार?
अंबादास दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून…, कुणाचा पलटवार?