सर्व तामझाम हा पैशाच्या मस्तीचा; मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून अंबादास दानवे यांचा टोला
"तामझाम हा पैशाच्या मस्तीचा आहे. कारण शिवसेनेची सभा ही उत्स्फुर्तपणे होत असते. आताच्या घडीला असं होत नाही म्हणून एवढा तामझाम करावा लागला", असा टोला अंबादास दानवेंनी लगावला.
“तामझाम हा पैशाच्या मस्तीचा आहे. कारण शिवसेनेची सभा ही उत्स्फुर्तपणे होत असते. आताच्या घडीला असं होत नाही म्हणून एवढा तामझाम करावा लागला”, असा टोला अंबादास दानवेंनी लगावला. पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेवरूनच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोक आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Published on: Sep 11, 2022 04:28 PM