Video | अंबरनाथचा ‘सिलिंडर मॅन’ रातोरात बनला स्टार, सोशल मीडियावर व्हायरल सागर जाधवची हवा !

| Updated on: Jun 29, 2021 | 6:52 PM

रनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav) असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचं मोठं कौतुक होतंय (Sagar Jadhav A cylinder Man from Ambernath photo goes viral on social media).

“30 किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण 45 किलोचं असून कसं चालेल?” हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचं. याच जिद्दीने सागरनं गेल्या 2-3 वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला.

Published on: Jun 29, 2021 06:52 PM
Video | शरद पवार-मुख्यमंत्र्यांची वर्षावर महत्वाची बैठक, अर्ध्या तासापासून खलबतं
Breaking | शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी, पावसाळी अधिवेशनात हजर राहण्याचे आदेश