अंबरनाथने तापमानात विदर्भालाही मागे टाकलं

अंबरनाथने तापमानात विदर्भालाही मागे टाकलं

| Updated on: Mar 15, 2022 | 7:24 PM

हवेतली आर्द्रताही कमी झाल्यानं कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. आज दुपारी अंबरनाथ शहरात 42 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली.

दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात  उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतली आर्द्रताही कमी झाल्यानं कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. आज दुपारी अंबरनाथ शहरात 42 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचवेळी विदर्भात मात्र 38 ते 39 अंशांवर पारा होता. त्यामुळे तापमानात अंबरनाथ  शहरानं विदर्भालाही मागे टाकल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथमध्ये दुपारच्या या उन्हात नागरिकांना अक्षरशः चटके बसू लागल्यानं नागरिकांनी शितपेयांच्या गाड्यांवर गर्दी केल्याचंही दिसत आहे.

शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
गोव्याचा मुख्यमंत्री कोण असणार? प्रमोद सावंतांना संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल