Video | अंबरनाथमध्ये किडणी विकण्याचे आमिष दाखवत महिलेला लाखोंचा गंडा
मूळच्या नेपाळच्या तसेच भारतात राहत असलेल्या एका महिलेला नेपाळी गायिकेने फसवलं आहे. मूळच्या नेपाळच्या असलेल्या कल्पना मगर या अंबरनाथला त्यांचे पती आणि मुलांसह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती एका बांधकामावर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालनपोषण करतात. कल्पना या नेपाळमध्ये असताना 2019 साली नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या.
मूळच्या नेपाळच्या तसेच भारतात राहत असलेल्या एका महिलेला नेपाळी गायिकेने फसवलं आहे. मूळच्या नेपाळच्या असलेल्या कल्पना मगर या अंबरनाथला त्यांचे पती आणि मुलांसह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती एका बांधकामावर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालनपोषण करतात. कल्पना या नेपाळमध्ये असताना 2019 साली नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. 2020 साली त्या भारतात राहायला आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर रुबिना बादी यांना शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर रुबिना बादी यांच्याशी चॅटिंग करू लागल्यानंतर कल्पना यांनी तिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगितलं. त्यावर रुबिनाने कल्पना यांना आपण आता दिल्लीत राहायला आलो असून आपण आपली किडनी विकल्यानं आपल्याला 4 कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुलाही तुझी किडनी विकायची असल्यास 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील, त्यानंतर तुला परदेशात नेऊन तुझी किडनी काढली जाईल, अशी बतावणी केली.