आंबोली घाटातील धबधब्याचं रौद्ररुप तुम्ही पाहिलं का?, रस्त्याची झाली नदी अन्…

| Updated on: Jul 09, 2024 | 2:12 PM

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सिंधुदुर्गातील कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात मोठ्या प्रवाहाने धबधबे कोसळताना दिसताय. इतकंच नाहीतर आंबोली घाटातील धबधब्यानी रौद्ररूप धारण केल्याचे चित्र समोर आलं आहे

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सिंधुदुर्गातील कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात मोठ्या प्रवाहाने धबधबे कोसळताना दिसताय. इतकंच नाहीतर आंबोली घाटातील धबधब्यानी रौद्ररूप धारण केल्याचे चित्र समोर आलं आहे. आंबोली घाटात ठिकठिकाणी ओसंडून धबधबे वाहत असून आंबोली घाटातील रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त केल्याचं चित्र दिसत आहे. तुम्ही देखील रौद्ररूप धारण केलेल्या धबधब्याचा व्हिडीओ पाहिल्यास तुमच्या मनात देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनिर्बंधीत पर्यटनावर चाप लावण्याच्या दृष्टिने कडक निर्बंध वन विभागाकडून लागू करण्यात आले आहेत. आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांनी जर कचरा केला किंवा माकडांना खायला घातलं तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना आता घाट व धबधबा परीसरात स्वच्छता राखण्यास बंधनकारक आहे. सावंतवाडी वनविभागाकडून आंबोली घाटात कचरा टाकणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Published on: Jul 09, 2024 02:12 PM
दबक्या पावलानं आला अन् काही कळण्याच्या आत त्याने कुत्र्याला… पाहा CCTV फुटेज
तुफान पावसामुळे पूलच गेला वाहून, बीड-अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला; व्हिडीओ पाहून तुम्हीही…