मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले

| Updated on: Jul 28, 2021 | 9:20 AM

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे, तर पुत्र अमित ठाकरेंचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.

मनसे नेते अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) आजपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज दुपारपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित यांचा अॅक्टिव्हनेस वाढलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.

Published on: Jul 28, 2021 09:20 AM
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 28 July 2021
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021