डोकं टेकून दर्शन…! सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
लालबागचा राजा गणेश मंडळासाठी हा अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
मुंबईत अमित शाह यांचा दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमित शाह लालबागमध्ये दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत होते. लालबागचा राजा मंडळात अमित शाह यांच्या भेटीनिमित्त विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चोख सुरक्षेत त्यांनी लालबागच्या राजा मंडळात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी डोकं टेकलं. लालबागचा राजा गणेश मंडळासाठी हा अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
Published on: Sep 05, 2022 12:55 PM