आधी लालबागच्या राजाचं दर्शन, नंतर बीएमसी निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक! अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याकडे लक्ष

| Updated on: Sep 05, 2022 | 8:14 AM

मुंबई पालिकेसाठी भाजपची काय रणनिती असणार आहे, याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते. भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai Today) मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते लालबागच्या राजाचं (Lalbaug cha Raja) दर्शन घेतील. सकाळी 10 वाजता ते लालबागचा राजा मंडळाला भेट देणार आहेत. त्यानंतर 11 वाजता त्यांची भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत आणि महत्त्वाच्या नेत्यांशी बैठकही होईल. दरम्यान, या बैठकीदरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) अनुषंगाने महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेसाठी भाजपची काय रणनिती असणार आहे, याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते. भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीलाही अमित शाह दर्शनासाठी भेट देण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री अमित शाह यांचं रात्री दहा वाजता मुंबईत आगमन झालं होतं. नेमका अमित शाह यांचा आजचा कार्यक्रम कसा असणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात, या व्हिडीओच्या माध्यमातून…

Published on: Sep 05, 2022 08:12 AM
Ramdas Kadam : ‘मी वाट बघतोय, ते तोंड कधी उघडतात’ रामदास कदम यांचं भास्कर जाधव यांना चॅलेंज
मोठी बातमी- मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपाल कोश्यारींकडून मविआच्या 12 आमदारांची यादी रद्द