वारकरी संप्रदाय आणि रामानुजाचार्याच्या सिद्धांताचा संबंध काय?; अमित शहांनी दिला दाखला

| Updated on: Feb 08, 2022 | 11:11 PM

केद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला (Statue Of Equality) भेट दिली. यावेळी त्यांनी सांप्रदायिक मुद्यांवरून विविध दाखले दिले आहेत.

हैदराबाद : केद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला (Statue Of Equality) भेट दिली. यावेळी त्यांनी सांप्रदायिक मुद्यांवरून विविध दाखले दिले आहेत. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले. अनेक संप्रदायाचा मूळापासून अभ्यास केल्यास रामानुजाचार्यांचा (Ramanuja) विशिष्ठद्वैत असल्याचंच दिसून येतं. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या मूळाशी गेला तर रामानुजाचार्यांच्या विशिष्ठा अद्वैतचा सिद्धांत दिसून येईल. राजस्थान आणि गुजरातच्या वल्लभ संप्रदायात गेल्यास त्यातही तेच सापडेल. मध्यभारत आणि मणिपूरच्या चैतन्य संप्रदायात गेल्यास त्याच्या मूळाशीही विशिष्ठा अद्वैतच सापडेल. आसाममध्ये शंकर देव आणि महादेव देवाच्या उपदेशात गेल्यास त्यातही तुम्हाला हाच सिद्धांत दिसेल. एका व्यक्तीने सिद्धांत दिला. त्यात समानता होती. रामानुजाचार्य हे कधी आसाम, मणिपूरला गेले नसतील. पण प्रत्येक ठिकाणी भक्ती संप्रदायाचे लोक भेटतात. असे अनेक दाखले आज अमित शाह यांनी दिले आहेत.

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन
रामानुजाचार्य विनम्र तितकेच विद्रोही – अमित शहा