Special Report | अमित शाहा राज ठाकरेंची भेट घेणार?

| Updated on: Sep 02, 2022 | 10:34 PM

आता पर्यंत 4 मोठ्या भेटी झाल्यात. भाजपचे 3 नेते आणि मुख्यमंत्री शिंदेही राज ठाकरेंना भेटलेत. फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती आहे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि त्यानंतर शिंदेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. त्यामुळं मनसेला सत्तेत घेऊन, आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती फिक्स करण्याचा रणनीती आहे का ? असाही सवाल आहे. त्यामुळेच सर्व नजरा, अमित शाहांच्या दौऱ्याकडे लागल्यात.

मुंबई : शिंदे गट आणि भाजप सरकारमध्ये आता मनसेही सहभागी होणार का ? याचा फैसला अमित शाहांच्या(Amit Shah) मुंबई दौऱ्यातच होणार असल्याची चर्चा आहे. 4 तारखेला अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळं राज ठाकरेही(Raj Thackeray) अमित शाहांची भेट घेणार का ?, याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाच्याच नजरा आहेत. राज ठाकरे अमित शाहांना भेटलेत, तर त्यात वावगं काय? असा सवाल करुन मनसेच्या संदीप देशपांडेंनी आणखी भुवया उंचावण्याचं काम केलं.

आता पर्यंत 4 मोठ्या भेटी झाल्यात. भाजपचे 3 नेते आणि मुख्यमंत्री शिंदेही राज ठाकरेंना भेटलेत. फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती आहे, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि त्यानंतर शिंदेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. त्यामुळं मनसेला सत्तेत घेऊन, आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती फिक्स करण्याचा रणनीती आहे का ? असाही सवाल आहे. त्यामुळेच सर्व नजरा, अमित शाहांच्या दौऱ्याकडे लागल्यात.

4 सप्टेंबरला रात्री साडे 9 वाजता अमित शाह मुंबईत येणार आहेत.  रात्री 10 नंतर, सह्याद्री अतिथी गृहावरच थांबणार आहेत. 5 सप्टेंबरला सकाळी साडे 10 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. दुपारी 12 वाजता अमित शाह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येणार. दुपारी सव्वा 2 वाजता अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी येतील. संध्याकाळी साडे 5 वाजता नायक चॅरिटेबल ट्रस्टच्या एका विद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आणि रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी दिल्लीला रवाना होणार.

इकडे मनसेसोबतच्या युतीच्या चर्चेवरुनच, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी तात्काळ नकार दिलाय. मनसेला सोबत घेण्याची काहीही गरज नाही, असं आठवलेंचं म्हणणंय.  भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचीच आहे. त्यामुळं शिवसेनेला मात देण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे अशी महायुती करण्यावर भर दिसतोय.

Published on: Sep 02, 2022 10:34 PM
Special Report | अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भूकंप आणणार?
चिमुकल्याचा आदित्य ठाकरेंना दिला विश्वास