शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं? महायुतीच्या कोणत्या फॉर्म्युल्याची चर्चा?
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती पक्षांचं जागा वाटप आता जवळपास निश्चित झाले आहे. तर अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपाचं गणित ठरलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका अंतिम टप्प्यात आल्यात. अमित शाह यांनी तीन वेगवेगळ्या बैठका घेतल्या. रात्री देवेंद्र फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास एक तासभर बैठक झाली आणि दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सह्याद्री अतिथी गृहावर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित अजित पवार, सुनील तटकरे यांची बैठक घेतली. थोडक्यात जागा वाटपाची सूत्र अमित शाह यांनी हाती घेतल्याची चर्चा आहे. तर या बैठकीतून महायुतीचा फॉर्म्यूला निश्चित झाल्याची चर्चा असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजप १५५ ते १६० जागा, शिंदे गट शिवसेना ७३ ते ७५ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ६० ते ६२ जागा मिळू शकतात. शिंदेंसोबत झालेल्या शहांच्या बैठकीत शिंदेंनी महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. लोकसभे प्रमाणे जागा वाटप आणि उमेदवारी घोषित करण्यास उशीर नको, अशी विनंतीही त्यांनी शहांकडे केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट