VIDEO : अमित ठाकरेंचे अप्रतिम पास, उत्कृष्ट गोल, फुटबॉलच्या मैदानात भन्नाट कौशल्य

| Updated on: Aug 21, 2021 | 11:43 AM

एरव्ही राजकारणाच्या मैदानात दिसणारे मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आज फुटबॉलच्या मैदानात पाहायला मिळाले. अमित ठाकरे हे फक्त फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी आले नाहीत, तर त्यांनी सामन्यात स्वतः सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

मुंबई : एरव्ही राजकारणाच्या मैदानात दिसणारे मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आज फुटबॉलच्या मैदानात पाहायला मिळाले. निमित्त होते पक्षाचे माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल सामन्यांचे. अमित ठाकरे हे राजकारणात नावारूपाला येत असले तरी त्यांची पहिली आवड ही खेळ आणि त्यात आवर्जून फुटबॉल ही आहे. अमित ठाकरे हे फक्त फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी आले नाहीत, तर त्यांनी सामन्यात स्वतः सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

त्यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाचे प्रतिनिधित्व केलं. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रिमझिम पावसाच्या उपस्थितीत सुरू असलेल्या सामन्यात अमित ठाकरे यांनी दोन उत्कृष्ट गोल लगावले आणि काही अप्रतिम पासही केले. अमित ठाकरेंच्या संघाने सांघिक कामगिरीने वांद्रे फुटबॉल संघावर विजय मिळवला.

Ajit Pawar Baramati | बारामतीत अजित पवारांच्या हस्ते पोर्टेबल कोविड सेंटरचं उद्घाटन
Pune NCP Protest | चाकणकरांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं जागरण-गोंधळ आंदोलन