मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेकडून तशी चाचपणी देखील सुरु आहे. आता माहिती अशी आहे की जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर त्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही. काय आहे बातमी सविस्तर पाहा
महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले असताना महाविकासआघाडीत बैठकांचा सिलसिला वाढला आहे. विधानसभेसाठी जास्त जागा असल्याने चर्चेसाठी वेळ लागतो. लवकरच यादी जाहीर केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत ही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
सध्या सर्वच पक्षांकडून जागावाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकासआघाडी मुंबईत उद्या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. पण अद्याप या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. संजय राऊत म्हणाले की, यामध्ये परवानगीचा विषयच नाही. भावना व्यक्त करायला परवानगी कशाला हवी असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे गटाने मोठा बॉम्ब टाकल्याचं कळतं. ठाकरे गटाने मुंबईतील सर्वाधिक जागा मागितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
"महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आहेत. कॉंग्रेस पक्षाचं नेतृत्व एक नाही, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे अनेक नेते आहेत. काही माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे चेहरा असेल तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे", असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.
राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या 10 दिवसांत 2 वेळा भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटात आश्चर्य व्यक्त केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई क्रिकेटचे असलेले महत्त्व, वानखेडे स्टेडीयम आणि वलय यामुळे भाजप नेते आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आपले वर्चस्व राहावे असे वाटत होते. पण महाराष्ट्र भाजपमधील अदृश्य शक्ती आणि आशिष शेलार यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षामुळे निवडणुकीच्या डावपेचाच्या पुढील गुप्त घटना घडल्या.
ठाकरे गटाच्या गोटातील एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता पक्षाकडून वरुण सरदेसाई यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाली आहे. या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकीसाठीचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे.