पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद, समस्या जाणून घेतल्या
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे.
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. ठाकरे यांचा पुण्यातील हा पहिलाच राजकीय दौरा आहे. ते शहर, जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी हितगूज करणार असून, जाहीर कार्यक्रमांद्वारे संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे. दरम्यान अमित ठाकरेंनी पुण्यातील एच.व्ही.देसाई (H.V Desai) महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद साधलाय. अमित ठाकरेंचं (Amit Thackrey) पुण्यात आज जंगी स्वागत करण्यात आलंय. पुण्यातील पक्ष वाढीसाठीचे हे प्रयत्न असल्याचंही म्हटलं जातंय.
Published on: Aug 12, 2022 07:45 PM