ईडीच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोत यांचा समाचार

| Updated on: Apr 28, 2024 | 1:41 PM

ईडीचा वेग आणखी वाढवला पाहिजे... जे आपल्याकडे आले नाहीत ते घाबरून मेलाच पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. यावर अमोल कोल्हे यांनी पलटवार केलाय. जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, तर तो भिडणार, नडणार आणि....

ईडी चौकशीचा वेग वाढवा..मात्र जेवढा वेग वाढवाल, जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, तर तो भिडणार, नडणार आणि मराठी माणूस उसळणार हे नक्की आहे, अशा सडेतोड शब्दात अमोल कोल्हे यांनी सदाभाऊ खोत यांच्या इडीची गती वाढावा, गडी एकतर महायुतीत आला पाहिजे नाहीतर भीतीने मेला पाहिजे या केलेल्या विधानावर त्यांनी समाचार घेतला आहे. पुढे ते कोल्हे असेही म्हणाले की, या महाराष्ट्राने आदिलशाही बघितली, मोगलशाही निजामशाही बघितली, पण या शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की, जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडलं पण वाकणार नाही, तर तो भिडणार, नडणार अशा पद्धतीने अरेरावी करत असणार तर मराठी माणूस उसळणार हे नक्की आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Apr 28, 2024 01:41 PM
पण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, शेंडगेंच्या गाडीवरील शाईफेक प्रकरणानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर…, ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा