‘त्या’ चित्रपटासंदर्भात दुसऱ्या बाजूचा विचार मांडला जाणं गरजेचे आहे : Amol Kolhe
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.त्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी मत मांडलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.त्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी मत मांडलेय. चित्रपटा मधील कोणतीही कलाकृती ही एक विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे त्या चित्रपटातील दुस-या बाजुचा विचार मांडला जाणं हे गरजेचे आहे. त्यातून नक्की काय घ्यायचे आणि हा विचार दाबला जातं आहे. जनता सुज्ञ आहे त्या जनतेला माहितेय आपल्याला त्या चित्रपटातून काय घ्यायचे. मात्र काही प्रमाणात एक विचार दाबून समाजाची दिशाभुल केली जातेय की काय अशी शंका उपस्थित होत असल्याचे खासदार कोल्हेंनी म्हटलंय.