विजय शिवतारेंची राष्ट्रवादीच्या नेत्यानं इशारा देत काढली लायकी अन् औकात, बघा काय केला हल्लाबोल?
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य करत बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यानं त्यांना चांगलंच घेरलं आहे.
मुंबई, १३ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यानेच अजित पवार यांना चॅलेंज दिलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य करत बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यानं त्यांना चांगलंच घेरलं आहे. अमोल मिटकरी यावर म्हणाले, विजय शिवतारे ही हलकट स्वभावाची व्यक्ती असून आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजित पवार यांच्या बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहणार असल्याची मिजाज मारत आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले तर विजय शिवतारे यांना आवर घाला, अशी काल मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली. मात्र तरीही ते आवरले जात नसतील तर त्यांना त्यांची लायकी, औकात आणि येणाऱ्या लोकसभेत त्यांनी त्यांचं डिपॉझिट वाचवून दाखवावं असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आव्हान आहे. तर अजित पवार यांच्यावर भुंकण्याचा प्रयत्न करू नये, तुमचा हलकटपणा, उर्मटपणा महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आपली पायरी पाहून वागावं नाहीतर शिवतारेंना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची औकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.