दुपारी १२ ला उठतात, दारू पितात, रात्री जुगार अन्… रवी राणांचा निशाणा कुणावर?
अमरावतीतलं राजकारण सध्या चांगलंच तापतंय. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी विरोधी उमेदवारांवर निशाणा साधलाय. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे दारू आणि जुगारातच व्यस्त असतात, असं वक्तव्य रवी राणांनी केलं आहे.
अमरावती लोकसभेच्या मैदानात सध्या राणा विरूद्ध बच्चू कडू असा सामना रंगतोय. तोडीबाज, बी टीमपासून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आता दारू आणि जुगारापर्यंत येऊन पोहोचले आहेत. अमरावतीतलं राजकारण सध्या चांगलंच तापतंय. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी विरोधी उमेदवारांवर निशाणा साधलाय. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे दारू आणि जुगारातच व्यस्त असतात, असं वक्तव्य रवी राणांनी केलं आहे. रवी राणांनी केलेल्या टीकेनंतर प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी चांगलेच संतापलेत. तुमच्याही बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील असा इशाराच बच्चू कडू यांनी दिल्यात. बच्चू कडू इतक्यावरच थांबले नाही, तर नवनीत राणा यांना पाडण्यात सर्वात मोठा हात रवी राणांचा असेल त्यांची भाषा आणि वागणूकीमुळे नवनीत राणा पडतील असा पलटवार बच्चू कडू यांनी केला.
Published on: Apr 22, 2024 10:35 AM