नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा; शिवीगाळ, अंगावर खुर्च्या भिरकवल्या अन् अल्लाहच्या घोषणा

| Updated on: Nov 17, 2024 | 12:10 PM

'मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. मला त्यांनी मारलं माझ्या अंगावर त्यांनी खुर्च्या फेकल्या. माझ्या जातीवर त्यांनी शिवीगाळ केली. ', अशी नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावण्याचे पाहायला मिळतंय. अशातच प्रचारही अंतिम टप्प्यात असल्याचे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशातच अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार येथे माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांची सभा पार पडली. या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सभेसाठी आलेल्या काही लोकांनी सभेत खुर्च्या भिरकावल्या आणि सभेत मोठा गोंधळ घातला. नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा आरोप केला आहे इतकंच नाहीतर त्या थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. सभेतील या राड्यानंतर खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन आलं होतं. यावेळी ही राड्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Published on: Nov 17, 2024 12:09 PM
भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला दादांचा विरोध अन् नाऱ्यामुळे महायुतीत अजित पवारांची कोंडी
Ajit Pawar : ‘शरद पवारांना मी सोडायला नको होतं…’, बारामतीत अजित पवार नेमकं काय म्हणाले?