Special Report | अमरावतीत DCC बँक निवडणूक निकालानंतर खिसेकापूमुळं राडा!

| Updated on: Oct 05, 2021 | 8:49 PM

सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुरु असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनलचे प्रमुख यांचं एका व्यक्तीने अभिनंदन केलं. त्याच वेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न झाला. खिसेकापू त्याचक्षणी कार्यकर्त्यांना दिसला आणि कार्यकर्त्यानी संबंधित खिसेकापूला मारहाण सुरू केली.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी आज सकाळपासून गाडगे महाराज सभागृहात सकाळ पासून सुरु झाली. दुपारी 2 वाजताच्या सुमारास सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुरु असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनलचे प्रमुख यांचं एका व्यक्तीने अभिनंदन केलं. त्याच वेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न झाला. खिसेकापू त्याचक्षणी कार्यकर्त्यांना दिसला आणि कार्यकर्त्यानी संबंधित खिसेकापूला मारहाण सुरू केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज दिली मात्र कार्यकर्त्यांसोबत
जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांचा मुलगा पुतण्या याची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

याच वेळी झालेली गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. यात बबलू देशमुख यांच्यासह पुतण्यालाही ही लाठीचार्जचा सामना करावा लागला.
या प्रकरणी पोलीस संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे .

अमरावती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मुलावर आणि पुतण्यासह एकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. बबलू देशमुख हे निवडणूक जिंकल्यावर मतमोजणी ठिकाणी आले तेव्हा फटाके फोडण्यात आले. पोलिसांनी मनाई केली असता पोलिसांसोबत वाद घातल्याने प्रकरण चिघळले. पोलीस बबलू देशमुख यांच्या मुलावर आणि पुतण्यासह एकावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Satara | साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
Special Report | शाहरुखच्या केकेआरच्या पार्टीतही ड्रग्ज?