Loading video

दावा ठोकणार आता थेट कोर्टात बोलावं, बच्चू कडूंचं रवी राणांना थेट आव्हान, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Jun 18, 2024 | 11:29 AM

अमरावतीमध्ये बच्चू कडू विरूद्ध रवी राणा यांच्यातील वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना लोकसभा लढवण्यासाठी मातोश्रीवरून रसद मिळाल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. तर या आरोपानंतर बच्चू कडू रवी राणांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.

ठाकरे आणि राणे यांच्यातील सामना नवा नाही. तर अमरावतीमध्ये बच्चू कडू विरूद्ध रवी राणा यांच्यातील वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना लोकसभा लढवण्यासाठी मातोश्रीवरून रसद मिळाल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. तर या आरोपानंतर बच्चू कडू रवी राणांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. अपेक्षेप्रमाणे बच्चू कडू विरूद्ध रवी राणा हे एकमेकांच्या समोरा-समोर उभे ठाकले आहेत. महायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांच्यावर रवी राणांनी गंभीर आरोप केलेत. त्याच आरोपांना बच्चू कडू यांनीदेखील आव्हान दिलंय. अमरावती मतदारसंघातून बळवंत वानखेडे विजयी झालेत. तर १९ हजार मतांनी नवनीत राणांचा पराभव झाला. यासोबतच दिनेश बूब यांना ८५ हजार ३०० मतं मिळालीत. पण आता नेमका वाद काय होतोय…? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 18, 2024 11:29 AM
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार? ‘मविआ’चे ‘हे’ 3 फॉर्म्युले तयार
महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार की फक्त दबावतंत्र? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?