Bachchu Kadu on Navneet Rana : तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, बच्चू कडू यांनी सांगितलं पराभवाचं कारण
लोकसभा निकालात अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाचं कारण सांगितलं... बघा व्हिडीओ
नवनीत राणा या न्यायालयात जिंकल्या मात्र जनतेच्या कोर्टात हरल्या, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. लोकसभा निकालात अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा या जिंकल्या असत्या, असं वक्तव्य करून नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडू यांनी रवी राणांना देखील टोला लगावला आहे. ‘लोकसभेचा अर्ज भरायला जात असताना आयत्या वेळेवर न्यायालयाने त्यांना हवा तसा निकाल दिला. आमचं मैदान असताना त्यांनी आमचं मैदान मारलं. मात्र एकंदर पाहता न्यायालयात त्यांचा विजय पण लोक न्यायालयात पराभव झाला आहे.’, असं बच्चू कडू म्हणाले. तर राणा चूप राहीले असते तर नवनित राणा जिंकून आल्या असत्या. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले, मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही. राणा चूप राहिले असते तर नवनीत राणा जिंकून आल्या असत्या.