मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसात ठाकरे….राणांच्या दाव्यानं उडाली खळबळ

| Updated on: Jun 02, 2024 | 3:45 PM

देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे च गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असे खोचक वक्तव्यही रवी राणा यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा यांनी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील, असा मोठा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. येणारा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे च गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असे खोचक वक्तव्यही रवी राणा यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा यांनी केला. राणांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. तर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही नवनीत राणांचे काम केले आहे. दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अहकांरी नेत्याच्या अहंकाराचा चुराडा जनता करणार आहे. जनता त्यांना धडा शिकवणार आहे. अहंकारी नेत्याचा अहंकार दाबण्याचं काम जनतेने केलं असल्याचेही रवी राणा म्हणाले.

Published on: Jun 02, 2024 03:45 PM
महाराष्ट्रात भाजपला फटका बसणार, लोकसभा निकालाआधीच कुणाचं रोखठोख भाकीत?
प्लीज मला मारू नका, रवीना टंडन करतेय गयावया, भर रस्त्यात कुणी घेरलं? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल