‘उद्धव ठाकरे यांची महाविकासआघाडीसमोर लाचारी’, कुणी केला हल्लाबोल
VIDEO | 'उद्धव ठाकरे जनतेची दिशाभूल करतायेत, ते पूर्णपणे महाविकास आघाडीत कन्व्हर्ट झालेत'
अमरावती : उद्धव ठाकरे यांची कालच मालेगावमध्ये जाहीर सभा झाली. या सभेवरून राजकीय वर्तुळात एकच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्द्यावर टीका केली आहे. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं की, सावरकर माझे दैवत आहे. मग त्यांच्या दैवताचा वारंवार अपमान राहुल गांधी हे करत आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे याची लाचारी महाविकास आघाडी समोर दिसून येत आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे हे जनतेची पूर्णपणे दिशाभूल करत आहे. लोक त्यांना जनाब म्हणतात. त्याच जनाबप्रमाणे ते पूर्ण महाविकासआघाडीत कन्व्हर्ट झाले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. कन्व्हर्ट झलेले उद्धव ठाकरे अशाप्रमाणे दुटप्पी भूमिका घेत आहे. असे न करता त्यांनी स्पष्ट करायला हवे की त्यांचे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत की राहुल गांधी त्यांचे दैवत आहेत, असेही रवी राणा म्हणाले.