एकनाथ शिंदे यांना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाच रवी राणा यांचं आव्हान; म्हणाले, ‘मी राजीनामा देतो…’
वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाच आमदार रवी राणांनी दिलं खुलं आव्हान
अमरावती : वारंवार अदित्य ठाकरे हे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. किंवा ठाण्यातून तुम्ही राजीनामा द्या मी तिथून लढतो, असे आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले होते, त्यावर अमरावतीचे खासदार रवी राणा यांनी भाष्य केले आहे. जेव्हा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आव्हान दिलं होते, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी कुठूनही उभं राहू देत त्यांच्या विरोधात नवनीत राणा उभी राहण्यास तयार आहे, असे एका महिलेने म्हटले होते. नवनीत राणा यांनी आव्हान दिले तेव्हा त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. एका महिलेच्या आव्हानाला ते कमी पडले, डरपोक सारखे मागे गेले, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
असे असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना आव्हान करताय, आज माझे अदित्य ठाकरे यांना आव्हान आहे की, मी राजीनामा देतो त्यानी माझ्या बडनेरा मतदार संघात माझ्या विरोधात निवडणूक लढवावी किंवा त्यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी त्यांच्या विरोधात वरळी मधून निवडणूक लढवायला तयार आहे, असे त्यांनी रवी राणा यांनी म्हटले आहे.