‘ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही, सेटलमेंटसाठी…’, रवी राणांचा नाव न घेता बच्चू कडूंवर निशाणा

| Updated on: Oct 25, 2024 | 6:00 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागपूर येथे आलो आहे. महाराष्ट्राचे नेते फार्म भरत आहे म्हणून त्यांना पाठिंबा तर आहेच पण शुभेच्छा देण्यासाठी आलो, असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.

Follow us on

बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली. त्यामुळे बच्चू कडू निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर राणांनी मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, यावर बोलताना रवी राणांनी त्यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. ‘अशा किती आघाड्या येतात आणि जातात मतदारसंघातले किंवा महाराष्ट्रातील मायबाप जनता हे ठरवते की कोण काम करते आणि कोण नाही. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते स्वतः निवडून येतील का याची शाश्वती नाही त्यांचा मतदारसंघ पूर्ण भकास झालेला आहे. बेरोजगार झालेला आहे. पाणी पिण्याचे सुविधा नाही. विद्यार्थ्यांना कॉलेज नाही आणि ते आघाड्या बनायला लागले. ह्या आघाड्या कशाला बनवतात सेटलमेंट साठी बनतात’, असे म्हणत रवी राणांनी निशाणा साधला तर माझी जागा आधीच पक्की आहे. मी महायुतीचा घटक पक्ष आहे. मला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची साथ आहे आणि पाठिंबा आहे, असेही रवी राणा म्हणाले. तर अमरावतीमध्ये महायुतीत काही धुसफूस सुरू आहे. त्यासंदर्भात आनंदराव अडसूळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, असे असतान माझी तक्रार केली म्हणून मी भेटायला आलो नाही, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले. लोकशाही मध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. महायुतीमध्ये उमेदवार म्हणून मी आधीच प्रचार सुरू केला आहे. उमेदवार म्हणा किंवा घटक पक्ष म्हणून मी प्रचार सुरू केलेला आहे, असेही त्यांनी म्हटले.