गौतमी पाटील बेभान नाचत होती अन् स्टेडवर उडाला आगीचा भडका, नेमकी कायं घडलं?
अमरावतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या कडून अचलपूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात दरम्यान, स्टेजलाच आग लागल्याची घटना घडल्याचे पाहायला मिळाले.
अमरावतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या कडून अचलपूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या या भव्य दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचं वातावरण तयार केलं होतं. यासोबत या भव्य दहीहंडी स्पर्धेच्या कार्यक्रमाला लावणी सम्राट गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम खास आयोजित केला होता. सबसे कातिल गौतमी पाटील हिला आणि तिच्या लावणीला बघण्यासाठी हजारो चाहत्यांनी अचलपूरमध्ये एकच गर्दी केली होती. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रम सुरू असताना स्टेजला अचानक आग लागून एकच भडका उडाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना स्टेजला आग लागण्याची घटना घडली. अमरावतीमध्ये आणि अचलपूरमध्ये लोकांनी खुप प्रेम केलं…मला भरभरून प्रेम दिलं. मी अमरावतीमध्ये देवीचं दर्शन घेतले. मला महाराष्ट्रामध्ये सर्वांचं जास्त प्रेम मिळत असतं, असे सांगत असताना मी राजकारणात कधीच जाणार नाही. मी कलाकार असल्याचे गौतमी पाटील म्हणाली, तर आगीवर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, थोडी आग लागली होती.