राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन, बघा काय मागितलं नवनीत राणांनी साकडं?

| Updated on: Sep 08, 2024 | 3:09 PM

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील मानाचा व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

राणा दाम्पत्य आज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.  ‘लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. आता आणखी सकारात्मक ऊर्जेने काम करणार आहे. देवाच्या दर्शनासाठी कोणीच व्हीआयपी नसतं. जेव्हा तुम्ही भाविकांच्या चेहऱ्यावर हासू, आनंद बघता त्यावेळी आणखी उत्साह आणि ऊर्जा मिळते. ‘ असे नवनीत राणा म्हणाल्या तर पुढे त्या असेही म्हणाल्या. ‘मराठीमध्ये MP ला खासदार म्हणतात, म्हणजे तो खास असतो पण मी सर्वसामान्य नागरिकांचे पाच वर्ष काढले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी कोणती गोष्ट खास नाही. देवाच्या चरणी आम्हाला आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही जनतेची आणखी सेवा करू शकू… आणि राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार येऊदे आणि त्यांची जोडी नेहमी सदाबहार राहूदे’, अशी प्रार्थन नवनीत राणांनी लालबागच्या चरणी केली.

Published on: Sep 08, 2024 03:09 PM