महिला आरक्षणाच्या विधेयकावर नवनीत राणा म्हणाल्या, ‘खूप वर्षांपासून ऐकलं होतं…’
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभेत महिला आरक्षणासंबंधित नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची घोषणा केली. यावर अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी काय केले भाष्य? बघा व्हिडीओ
नवी दिल्ली,१९ सप्टेंबर २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभेत महिला आरक्षणासंबंधित नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची घोषणा केली. यावर अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून संसदेत महिला आरक्षणाबद्दलची केवळ चर्चा होत होती. मात्र त्याचा कधी व्यवहारिकदृष्ट्या आम्ही विचार केला नही. पण नव्या संसदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास रचला. इतकेच नाही तर महिला आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा झाली या आरक्षणाचं श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं. कारण आज इतका मोठा निर्णय मोदी यांनी यांच्या कार्यकाळात घेतला असल्याचे म्हणत नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.
पुढे त्या असेही म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केल्यानंतर विरोधकांकडून केवळ बोट दाखवलं जात आहे. जर महिलांबद्दल विरोधकांना इतकाच आदर होता तर २५ ते ३० वर्ष आधीच हे विधेयक यायला हवं होतं, असा खोचक टोलाही नवनीत राणा यांनी विरोधकांना लगावला आहे.