सकाळी पोपटासारखं बोलणाऱ्यांचं…, अपात्रतेच्या निकालावर नवनीत राणा काय म्हणाल्या?

| Updated on: Jan 11, 2024 | 11:32 AM

राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा अखेर निकाल दिला. या निकालाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, शिवसेनेच्या गोटातून या निकालाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. यावर अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती, ११ जानेवारी, २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा अखेर निकाल दिला. तर एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. या निकालाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, शिवसेनेच्या गोटातून या निकालाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. यावर अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाला हातात घेऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं होतं. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हाती गेली ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले त्यांच्या हाती हा निकाल लागल्याने आनंद आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. निकाल लागू द्या नंतर बोलू असं म्हणणाऱ्यांची बोलती बंद झाली. मुख्यमंत्री बदलेल ही चर्चा फक्त असंतुष्ट लोकांमध्ये होती आणि दिवसा स्वप्न पाहणाऱ्या लोकांमध्ये होती, असे म्हणत त्यांनी संजय राऊत आणि ठाकरेंना टोला लगावला.

Published on: Jan 11, 2024 11:32 AM
कालच जेलमधून सुटका अन् आता परत गुन्हा, सुनील केदार अडचणीत?
Saamana : लोकशाहीचं तोंड जगात काळं करणारा… अपात्रतेच्या निकालावर ‘सामना’तून थेट हल्लाबोल