नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, ‘मातोश्री’बाहेर ‘हिंदू शेरणी’ अशी बॅनरबाजी

| Updated on: Mar 30, 2023 | 8:35 PM

VIDEO | नवनीत राणा आणि रवी राणा आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडणार? ‘मातोश्री’ बाहेर काय केली बॅनरबाजी?

मुंबई : गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या मातोश्री निवासस्‍थानासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. दरम्यान, आता नवनीत राणा यांच्या समर्थकांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख करण्यात आला असून ‘जो प्रभू श्रीराम का नही, वो किसी काम का नही’, असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. या बॅनरच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा लगावलाय. “उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालीसा पठणाला विरोध केला. हनुमान चालीसा वाचल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि 14 दिवस जेलमध्ये ठेवलं”, असं संबंधित बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. याशिवाय येत्या 6 एप्रिलला राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

Published on: Mar 30, 2023 08:35 PM
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते तर…, नारायण राणे यांची सडकून टीका
रामनवमी निमित्तानं थेट कॉफी हाऊसमध्येच युवकांनी केलं हनुमान चालीसा पठण!