निवडणूक आयोगाच्या निकालावर नवनीत राणा म्हणताय; जो राम, हनुमान का नही वो किसी काम का नही और…
VIDEO | जो राम, हनुमान का नही वो किसी काम का नही और.., निवडणूक आयोगाच्या निकालावर काय म्हणाल्या नवनीत राणा बघा
अमरावती : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आयोगाच्या कालच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब यांची विचारधारा होती त्यांवर आतापर्यंतची शिवसेना उभी होती. मात्र ज्यावेळी इतक्या मोठ्या संख्येने खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांनी सोडून बाहेर येताय म्हणजे ते ४० लोकं चुकीचे नाही तर एका व्यक्तीच्या चुकीमुळे हे सर्व बाहेर पडताय तर तो व्यक्ती चुकीचा आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी केलेल्या आतापर्यंतच्या कामाचे कौतुकही केले आणि केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत त्या म्हणाल्या जो राम का नही, जो हनुमान का नही, वो किसी काम का नही और उसके पास धनुष्यबाणही नही उसका धनुष्यबाणही नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली आहे.