Navneet Rana : आघाडीची बिघाडी होणार? पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नवनीत राणा यांनी काय घातलं साकडं?
VIDEO |अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्यांची पदयात्रा, अंबाबाईच्या दर्शनाला जात खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आणि मोदींविरोधात असणाऱ्या आघाडीची बिघाडी होणार आहे आणि पुन्हा २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यासाठी अंबाबाईला साकडं घालणार
अमरावती, २२ ऑक्टोबर २०२३ | शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या सुख समृद्धीसाठी दरवर्षी नवरात्रीमधील अष्टमीच्या दिवशा राणा दाम्पत्य यांच्या पदयात्रेला सुरूवात होते. राणा दाम्पत्याची अनवायी पायाने ही पदयात्रा असते. विदर्भाच कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्य ही पदयात्रा काढतात. अमरावतीमध्ये गंगा-सावित्री निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या अंबादेवीपर्यंत ही पदयात्रा निघते. यंदा देखील राणा दाम्पत्यांकडून ही अनवाणी पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी अंबाबाईच्या दर्शनाला जात असल्याचे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आणि मोदींविरोधात असणाऱ्या आघाडीची बिघाडी होणार आहे. आणि पुन्हा २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यासाठी अंबाबाईला साकडं घालणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून आम्ही ही पदयात्रा काढत आहोत. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना ताकद देण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.