नवनीत राणा यांचा जन्म ६ की १५ एप्रिलचा? ‘टीसी’वरून नवा वाद, कुणाचा सवाल
VIDEO | अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या टीसीवरून नवा वाद; ठाकरे गटाच्या खासदारानं नेमका काय केला सवाल?
अमरावती : नेहमीच सातत्याने या न त्या वादाने चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पुन्हा एका वादामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्रावरून वादात अडकलेल्या नवनीत राणा आता आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे आणि तो वाद आहे खासदार नवनीत राणा यांच्या टीसीचा… कारण अमरावतीमधील ठाकरे गटाचे सुनील खराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार नवनीत राणांच्या दोन टीसी समोर आणल्या आहे. यामध्ये एका टीसीवर खासदार नवनीत राणांचा जन्म 6 एप्रिल चा आहे आणि त्यावर शिख या जातीचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या टीसीवर 15 एप्रिल असा उल्लेख असून त्यावर मोची जातीचा उल्लेख आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा जन्म 6 एप्रिलचा की 15 एप्रिलचा असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. यानंतर आता नवनीत राणा यावर काय भाष्य करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
Published on: Apr 04, 2023 11:22 PM