शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 09, 2022 | 11:06 PM

घटनेपूर्वी मला फोन करुन बोलावण्यात आलं. माझ्या अंगावर शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आष्टीकर यांनी केलाय. तर प्रवीण आष्टीकर यांची अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग करण्यात आल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. या प्रकारामुळे अमरावतीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीतील (Amravati) राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाई फेकून निषेध नोंदवला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली. या प्रकारानंतर आता अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. घटनेपूर्वी मला फोन करुन बोलावण्यात आलं. माझ्या अंगावर शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आष्टीकर यांनी केलाय. तर प्रवीण आष्टीकर यांची अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग करण्यात आल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय. या प्रकारामुळे अमरावतीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपला पाचही राज्यात मोठा विजय मिळेल – PM Narendra Modi | PM Narendra Modi Interview |
भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी – मोदी