अमरावतीत 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक; मनपा अॅक्शन मोडवर, कारवाई होणार?
VIDEO | अमरावती शहरात 274 जाहिरात होर्डिंग आढळले धोकादायक स्थितीत, महानगरपालिका बजावणार नोटीस?
अमरावती : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात जाहिरातीचं होर्डींग कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या होर्डींगचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमरावती शहरातही तब्बल 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुण्यात जी घटना घडली त्यानंतर अमरावती महानगर पालिकेने या जाहिरातीच्या होर्डींगवर यांचं सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे अमरावती मनपाही ऍक्शन मोडवर आली आहे. जाहिरातीचे होर्डिंग असलेल्या संबंधित एजन्सीला मनपाने स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. सात दिवसाच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे.