अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नांदगाव पेठ भागातील कंपनीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 12, 2025 | 5:24 PM

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे. विषबाधा झालेल्या सर्व महिलांना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. दरम्यान, कपंनीतील काही महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीतील पाण्यातून किंवा नाश्त्यामधून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात महिलांना विचारण्यात आले असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. कंपनीत जवळपास 700 महिला काम करत आहेत. अनेक महिलांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळपासून त्रास होत असून पाणी पिल्यानंतर हा त्रास होतोय. सकाळपासून मळमळ होत आहे. तसेच उल्टी झाली आणि खूप पोट दुखत आहे.” ही घटना घडल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना रुग्णालयात आणलं आहे.

Published on: Jan 12, 2025 05:24 PM
‘महाराष्ट्रात रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम…’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
Gunaratna Sadavarte : ‘सुरेश धसांना दोन पत्नी…’, गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा