अमरावतीत अवकाळी पावसाची अवकृपा, पिकांची नासाडी अन् बळीराजा उद्धवस्त

| Updated on: Apr 26, 2023 | 1:14 PM

VIDEO | अमरावतीत अवकाळी पावसाचा पुन्हा कहर, शेत पिकांनं टाकली मान, बळीराजाला आर्थिक संकट, बघा काय झालं नुकसान?

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागाला गेल्या दोन दिवसांपासून गारपीटीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बसल्याचे पाहायला मिळाले. धामणगाव तालुक्यातील चिंचोली, भातकुली मंडळात मोठं नुकसान झाले असून बऱ्याच घरांची सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पडझड झाली तर उन्हाच्या पिकांनी या अवकाळी पावसांनं मानं टाकली आणि बरीच पीकं उध्वस्त झाली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. अवकाळी पाऊस आणि मोठाल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या मिरची, भेंडी, भाजीपाला आणि उन्हाळी कांद्याचे नुकसान झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Published on: Apr 26, 2023 01:14 PM
ना मेल किंवा मेसेज, माहिती न देताच घेतली परिक्षा?; कुठं झाला हा सावळा गोंधळ?
शाह हे धाराशिव आणि नागपूरमध्ये ‘ते’ बॅनर बघायला येत असतील; राऊतांची खोचक टीका